सुविचार संग्रह
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो...
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले
तर भले भले डोंगर हि फोडून निघतात...
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..
*मैत्री* च नाव काय ठेवू ?
*'स्वप्न'* ठेवलं तर अपूर्ण राहील...
*'मन'* ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की *'श्वास'* ठेवू
म्हणजे मरेपर्यंत *'सोबत'* राहील...
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो....
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या....
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात..!!
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते
तर सुख कोणाला कळलेच नसते.
आपल्याकडे जगाला देण्यासाठी काहीच नाही,
असं वाटत असेल तर.......
चेहर्यावर एक छान "SMILE" दया.....!!
खरच हा उपहार इतर कोणत्याही वस्तू पेक्षा खुपच "मौल्यवान" आहे.
"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही"'...
"मनुष्यच त्याला संपवतो",..
"कारण",.. "ते मरते एकतर "तिरास्कराने",..
दुसरे "दुर्लक्ष " केल्यामुळे,..
तिसरे "गैरसमजामुळे",.. आणि
चौथे "लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!
तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!!
नात ते टिकते ज्यात,
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो...!!
सोन्यात जेव्हा 'हिरा' जडवला जातो
तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर
हि-याचा बोलला जातो,,
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं,
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!
या जगात इतका श्रीमंत कोणी नाही
जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो,
पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात
आणि तेही विनामूल्य....
No comments:
Post a Comment